Written by Dr. Priyanka Borde.
पोटाच्या चरबीमुळे (Belly Fat) अनेक लोक त्रस्त आहेत. चुकीच्या खाण्याच्या पद्धती आणि बदलती जीवनशैली पोटावरची चरबी वाढण्यास कारण ठरते. पोटावरची चरबी कशामुळे वाढते याची कारणे आपण जाणुन घेवुया.
पोटावर चरबी वाढण्याची कारणे
1. बैठे काम / व्यवसाय :
जर तुमची काम करण्याची पद्धत ही केवळ बसून असेल तर पोटावरची चरबी वाढण्यास कारण असू शकते.
2. भूक नसताना खाणे :
जर तुम्ही भूक नसताना देखील खाणे सुरु ठेवत असाल तर पोटावरील चरबी नक्की वाढेल.
3. अग्निमांघ (Slow Metabolism) :
ज्यांची पाचनशक्ती चांगली नसते, ज्यांना खाल्लेल अन्न नीट पचत नाही त्यांची पोटावरची चरबी वाढते.
4. आनुवांशिकता
5. अंतस्त्रावी ग्रंथीचे रोग (Harmons Imbalance) :
ज्यांना Thyroid, Diabetes आहे ज्या मुलीना PCOD, PCOS चा त्रास आहे त्यांना देखील पोटावरची चरबी वाढल्याचा त्रास होतो.
6. खूप दिवसांपासून कुठल्याही औषधांचे सेवन करत असणार तेव्हा देखील शरीरावर चरबी वाढते.
7. ताण, तणाव, Anxiety, Depression यामुळे देखील शरीरावर चरबी वाढत जाते.
पोटावरची चरबी कमी करण्याचे उपाय :
1. भाज्यांना प्राधान्य द्या.
जेवणामध्ये जास्तीत जास्त भाज्या आणि कमीत कमी धान्यांचा वापर करा. गव्हाची पोळी खाणे टाळा त्याऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्यांना प्राधान्य द्या.
2. आलं खा.
अद्रक / आलं सुकवा या सुक्या आल्याची पावडर म्हणजे थमौजेनिकच मुख्य स्त्रोत आहे. यामुळे तुमची वाढलेली अतिरिक्त चरबी कीम होण्यास भरपूर मदत मिळते. पाण्यामध्ये सुठांची पावडर मिक्स करा आणि हे पाणी उकळवा. पाणी थोड्याफार प्रमाणात थंड झालं की याच पाण्याचं सेवन करा यामुळे चयापचय शक्ती अधिक वाढते तसेच अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी भरपूर मदत मिळू शकते.
3. भरपूर फायबर घ्या.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थाचे सेवन आवश्यक करावे यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. फायबर युक्त अन्नखाल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.फायबर अस्लेली फळे सफरचंद, केळी, पेरू, नाशपाती(pear) , बदाम, खजूर, सूर्यफूल बिया.
4. लिंबू अतिशय फायदेशीर :
लिंबू हे विटामिन सी आणि ॲटिऑक्सीडंट्स् चा एक महत्वाचा स्त्रोत आहे आणि शरीराला यामुळे बऱ्याच तऱ्हेने फायदा होत असतो नेहमी लिंबू पाणी पित राहिल्यास, वजन कमी होते. तसेच एक्स्ट्रा कॅलरी बर्न होते आणि तुम्हाला काम करण्यासाठी अधिक ऊर्जादेखील मिळते. लिंबामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि तुमचं शरीर सुडौल राहण्यासाठी मदत होते रोज सकाळी एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून उपाशी पोटी प्यावा.
5. नारळाचे पाणी प्या :
नारळाच्या पाण्यात इतर फळांपेक्षा जास्त इलेक्ट्रोलाईस्टस् असतात. नारळाच्या पाण्यात कोणतीही जोडलेली (शर्करा) आणि कृत्रिम प्ले फ्लेवर्स नसतात. नारळपाणी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि त्यात कॅलरी नसल्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही.
6. व्यायाम :
पोट कमी करण्यासाठी व्यायाम करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. व्यायाम सुरु करताना आधी हलके व्यायाम चालु करावेत त्यानंतर योगासने, Heavy Exercise चालु करु शकता. योगासनांमध्ये बलासन, नौकासन यांचा पोटावरची चरबी कमी करण्यासाठी चांगला फायदा होतो. तसेच सुर्यनमस्कार केल्यामुळे देखील पोटावरची चरबी लवकर कमी होण्यास मदत होते.